Advertisement Advertisement

दारूच्या नशेत सासूच्या घरासमोर येऊन पत्नी व सासूला शिवीगाळ…!सासू समजून सांगायला गेली अन् डोक्यात लाठी काठी….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दारूच्या नशेत सासूच्या घरासमोर येऊन पत्नी व सासूला शिवीगाळ केल्याचा तसेच समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सासूच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मलकापूर शहरातील मुश्ताकअली नगर परिसरात घडला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रजीयाबी सैयद सलीम (वय ५०, रा. मुश्ताकअली नगर, मलकापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीची मुलगी आणि आरोपी जावेद खान अफसर खान (वय ३४, रा. जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू आहे. त्यामुळे फिर्यादीची मुलगी मागील दीड महिन्यापासून आपल्या आईकडे राहत आहे.

दरम्यान, २८ जुलै रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता आरोपी जावेद खान हा दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या मुलीला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी फिर्यादी त्याला समजावून सांगण्यासाठी गेल्या असता आरोपीने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ५६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ३५२ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोहेका रिजवान करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!