मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली–देऊळगाव राजा महामार्गावरील मेरा चौकी परिसरात आज दुपारी झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच २८ एम ६९३३ क्रमांकाची टीव्हीएस व्हेक्टर दुचाकी आणि एमएच २८..५०३० क्रमांकाच्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात रोहन माळेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.













