Advertisement Advertisement

अवघ्या २८ व्या वर्षी आयुष्य संपलं; सकाळी शाळेजवळ दिसली गर्दी; पाहताच सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील २८ वर्षीय युवकाचा १६ जुलै रोजी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक हिम्मत घुगरे (वय २५, रा. धरणगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले असता मराठी शाळेजवळील सरकारी विहिरीच्या परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर राम रविंद्र नेरकर (वय २८, रा. धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी मर्ग क्रमांक ४३/२०२६ अंतर्गत कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!