Advertisement Advertisement

टीव्हीवरील चॅनलवरून वाद; पत्नी व अल्पवयीन मुलीला मारहाण, पतीवर गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): टीव्हीवर कोणते चॅनल पाहायचे, या किरकोळ कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादात पतीने पत्नी व अल्पवयीन मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खामगाव शहरातील रेखा प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता विवेक सावते (वय ३५, रा. रेखा प्लॉट, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, त्यांचे पती विवेक विजयसिंग सावते यांना दारूचे व्यसन असून, १४ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ते घरी आल्यानंतर टीव्हीवरील चॅनल बदलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

शाब्दिक वाद वाढल्यानंतर विवेक सावते यांनी पत्नीला शिवीगाळ करत घरातील प्लास्टिकच्या झाडूच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, आईला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या अल्पवयीन मुलगी मानवी हिलाही मारहाण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय पत्नी व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे खामगाव शहर पोलिसांनी विवेक विजयसिंग सावते याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!