Advertisement Advertisement

“‘तुला काम येत नाही, दिसायलाही चांगली नाही’ अन् तू काहीच कामाची नाही म्हणत विवाहितेचा छळ; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!” बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): हुंडा न दिल्याच्या कारणावरून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या नातेवाईकांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दहीगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या बुलढाणा शहरातील चिचोले नर्सिंग कॉलेजजवळ वास्तव्यास असलेल्या सौ. मिना उर्फ पल्लवी विजय लहाणे (वय ३०) यांचा विवाह सन २०१२ मध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या विजय भिकाजी लहाणे यांच्याशी झाला होता.

विवाहानंतर लग्नात हुंडा दिला नाही, घरातील काम येत नाही तसेच “तू दिसायला चांगली नाहीस” अशा स्वरूपाचे टोमणे मारून पती व सासरच्या नातेवाईकांनी सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.

या प्रकरणात महिला समेट कक्षामार्फत वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यातून कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर पीडित विवाहितेच्या जबाबावरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात पती विजय भिकाजी लहाणे व इतर नातेवाईकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन दांडगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!