Advertisement Advertisement

डब्यावरून वाद; तरुणाच्या डोक्यात डब्बा मारून हल्ला, गुन्हा दाखल…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मोताळा येथील हॉटेल समीर येथे जेवणाच्या डब्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेत एका तरुणाच्या डोक्यात डब्बा मारून त्याला जखमी करण्यात आले असून, बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगळद येथील रहिवासी रत्नदीप नाना साबळे (वय २८) हे सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हॉटेल समीर येथे जेवणाचा डब्बा घेऊन गेले होते. त्यावेळी शेख नासीर शेख साबीर (रा. मोताळा) याने त्यांच्या डब्यातील जेवण खाल्ले. त्यानंतर साबळे जेवणाचा डब्बा घेऊन घरी निघाले असता, आरोपीने त्यांच्याकडे मोटारसायकलची चावी मागितली. मात्र, चावी देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने रत्नदीप साबळे यांच्या डोक्यात डब्बा मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रत्नदीप साबळे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी शेख नासीर शेख साबीर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अशोक आडोकार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!