Advertisement Advertisement

शेगावात महिलेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल! पेठ मोहल्ला परिसरातील घटना…

शेगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील पेठ मोहल्ला परिसरात एका महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेख अय्याज उर्फ बाबा अब्दुल रहीम याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता पेठ मोहल्ला परिसरात ही घटना घडली. आरोपीने महिलेचा विनयभंग केल्यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे दिली आहे.

तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!