Advertisement Advertisement

सिनगाव जहागिरमध्ये ज्येष्ठ नागरिकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे बकरीसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना २ जुलै रोजी घडली. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींची ओळख कचरुबा रामराव सरोदे (वय ६०, रा. सिनगाव जहागिर) अशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदे हे बकरीसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असताना पांडुरंग धारे (रा. सिनगाव जहागिर) याने कोणतेही ठोस कारण नसताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आरोपीने सरोदे यांच्या डोक्यावर व पाठीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

. जाहिरात 👆

घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जखमी कचरुबा सरोदे यांच्या तक्रारीवरून पांडुरंग धारे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!