Advertisement Advertisement

जुन्या वादातून दोन महिलांना बेदम मारहाण; कपडे फाडून जळता विस्तव फेकल्याचा आरोप, अट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर शिवारात जुन्या वादातून दोन महिलांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना २६ जून रोजी दुपारी घडली. मारहाणीदरम्यान एका महिलेच्या अंगावर पेटत्या चुलीतील जळता विस्तव फेकण्यात आल्याचा तसेच पीडितेचे कपडे फाडल्याचा आरोप असून, या प्रकरणी चिखली पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या २ ते ३ साथीदारांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलगाव जहांगीर येथील प्रतीक्षा रमेश साळवे (वय २३) आणि त्यांची आई उषा रमेश साळवे या २६ जून रोजी दुपारी शेतात काम करत असताना शिवाजी किसन शिराळे (रा. शेलुद) व त्याच्या २ ते ३ साथीदारांनी जुन्या वादातून त्यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर दोघींनाही बेदम मारहाण करण्यात आली. या झटापटीत पीडित महिलेचे कपडे फाटल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने पेटत्या चुलीतील जळता विस्तव (कोळसा) उषा साळवे यांच्या साडीवर फेकला. दरम्यान, घडणाऱ्या प्रकाराचे मोबाइलवर चित्रीकरण करत असलेल्या प्रतीक्षा साळवे यांचा उजवा हात पिरगाळून त्यांचा मोबाइल हिसकावून फेकून देण्यात आला. तसेच, “शेतातून निघून गेल्या नाही तर तुम्हाला येथेच नग्न करून पाठवीन, पुन्हा शेतात आलात तर याच शेतात गाडून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

घटनेनंतर प्रतीक्षा साळवे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी किसन शिराळे व त्याच्या २ ते ३ साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३२४(४), ३५१(२), ३५१(३), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!