Advertisement Advertisement

२१ वर्षीय अपंग महिलेवर अत्याचाराचा आरोप; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय अपंग महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका ३६ वर्षीय आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ जून रोजी शौचासाठी शेताच्या परिसरात गेली असताना आरोपीने तिचा हात पकडून शेतातील नाल्याजवळ नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, ही घटना कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम आणि अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सचिन संजय मघाडे (वय ३६) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ११५(२), ३५१(२) तसेच अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!