Advertisement Advertisement

रस्त्यावर अडवून युवकावर चाकूहल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सारोळा येथील एका युवकाला अडवून मारहाण करत चाकूने जखमी केल्याची घटना ३ जून रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथील रहिवासी विकास हरिचंद्र जाधव हे ३ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जात होते. दरम्यान, चिखली रोडवरील विजयालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळील विजय पान पॅलेससमोर त्यांना पांडुरंग निंबाजी चव्हाण, प्रकाश निंबाजी चव्हाण, किशोर रोहीदास चव्हाण व विठ्ठल निंबाजी चव्हाण (सर्व रा. सारोळा) यांनी अडविले.

यावेळी चौघांनी मिळून विकास जाधव यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच किशोर रोहीदास चव्हाण याने चाकूने हल्ला करून त्यांच्या दंडावर व तळहातावर वार केल्याने ते जखमी झाले.

या घटनेप्रकरणी विलास हरिचंद्र जाधव यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून वरील चारही आरोपींविरुद्ध कलम 118(1), 352, 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!