Advertisement Advertisement

ती टायपिंग क्लासवरून घरी येत असताना; बाळू तिच्या मागुन आला अन् घट्ट मिठी मारली!  तेवढ्यात तिने…

अमरावती (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): टायपिंग क्लास करून घरी परतणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी वलगाव पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी सायंकाळी पीडित मुलगी वलगाव येथून क्लास करून घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत गैरवर्तन केले. मुलीने प्रसंगावधान राखत तेथून सुटका करून घेत घरी जाऊन प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली.

यानंतर पीडित मुलगी व तिच्या आईने वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिला पोलीस उपनिरीक्षक भारती मामनकर यांनी तत्काळ दखल घेत आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला.

वलगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलींसोबत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!