बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या तर एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याच्या तक्रारी अनुक्रमे बुलढाणा शहर, खामगाव ग्रामीण आणि रायपूर पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या आहेत.
जाहिरात ….👆
संशयित तरुणासोबत तरुणी बेपत्ता…
बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील येळगाव येथील १८ वर्षीय संजना मदन गवई ही १ मे रोजी रात्री घरातून बाहेर पडून बेपत्ता झाली आहे. रात्री १० ते पहाटे २ दरम्यान ती घरातून निघून गेल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती गावातील अविनाश रामदास डोंगरे याच्यासोबत जाताना दिसल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र हजारे करीत आहेत.
८० हजार रुपये व कागदपत्रांसह तरुणी बेपत्ता….
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत टेंभूर्णा येथील २१ वर्षीय निकीता सहदेव बोराळे ही १ मे रोजी सकाळी “संडासला जाते” असे सांगून घराबाहेर पडली, मात्र परतली नाही. तिच्यासोबत काळ्या रंगाची बॅग असून त्यात सुमारे ८० हजार रुपये रोख, आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रे असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण…
रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेख साहील शेख राजू याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार आशिष काकडे करीत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनातील मुलींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.














