Advertisement Advertisement

अगोदर तिने त्याच्या सोबत फोटो काढले,व्हिडिओ काढले; मग तिच्या अंगलट आले! नंतर पोरीने प्रकरण…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत एका २४ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी भीमराव रूपाजी इंगळे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या आरोपीने संबंधित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला. जानेवारी २०२० ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत त्याने तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले.

फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपीने तरुणीला खामगाव येथे बोलावून मोटारसायकलने शेगाव येथे नेले. तेथे एका लॉजवर नेऊन ‘शारीरिक संबंध ठेव, अन्यथा स्वतःचे नुकसान करेन’ अशी धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतरही जीविताची भीती दाखवत वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, तरुणीचे लग्न ठरले असताना २० मार्च २०२६ रोजी आरोपीने तिच्या होणाऱ्या पतीबाबत चुकीची माहिती देत लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. तसेच ३ एप्रिल रोजी ‘शेवटची भेट’ या कारणावरून पुन्हा तिला शेगाव येथे नेऊन अत्याचार केल्याचेही समोर आले आहे.

याचदरम्यान आरोपीने पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या नातलगांमध्ये तिच्याबाबत अपप्रचार करत तिचे फोटो दाखवून बदनामी करण्याचाही प्रयत्न केला. अखेर त्रस्त झालेल्या तरुणीने खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी भीमराव इंगळे याला २५ एप्रिल रोजी रात्री अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!