Advertisement Advertisement

भूत बंगल्यातील आत्महत्येने शेगाव हादरलं! ‘त्या’ चिठ्ठीने सगळा मामला उलटला! शेगावात आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा; पोलिस तपास सुरू!

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील भूत बंगला परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करीत तीन जणांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विजय चव्हाण, देवराज विजय चव्हाण (रा. सद्गुरू नगर, शेगाव) आणि अनिल ज्ञानदेव अवचार (रा. सातेगाव, ता. अंजनगाव, जि. अमरावती) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भूत बंगला, शेगाव येथील रहिवासी बरखा संतोष डांगे (वय ५०) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित आरोपींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा उल्लेख असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर १० सप्टेंबर रोजी फिर्यादीने शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!