Advertisement Advertisement

राजुरा लघु प्रकल्पाजवळ अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह..! पोलिसांनी दिली तिच्या विषयी माहिती! वाचा बातमी

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील रसलपूर परिसरात राजुरा लघु प्रकल्पाजवळ एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा गळा कापण्यात आलेला असून मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने ही निघृण हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेची ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिसराची पाहणी केली असता मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याचे समोर आले.

मृत महिला अंदाजे २० ते ३० वर्षे वयोगटातील असून तिची उंची सुमारे ५ ते ५.३ फूट आहे. रंग सावळा, केस काळे आहेत. अंगात हिरव्या रंगाचा टॉप, कथ्थई रंगाची काळ्या रेघांची पॅन्ट तसेच पायात गुलाबी रंगाचे सँडल आढळले. उजव्या हातात काळा धागा व डाव्या हातात हिरव्या बांगड्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेचा तपास वेगाने सुरू असून स्थानिक गुन्हे शाखा, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून जळगाव जामोद पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या वर्णनाशी मिळतीजुळती महिला बेपत्ता असल्याची माहिती अथवा कोणताही धागादोरा मिळाल्यास पो.नि. नितीनकुमार पाटील (मो. ९३२१५७९३४८) किंवा नागेश खाडे (मो. ८७८८९५२०१८) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!