Advertisement Advertisement

“१६ वर्षाच्या पोरीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखायला लागल्यावरच प्रकार उघड!”मग एक नाही दोन नाही तब्बल….

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील सातपुडा पायथ्याशी जवळ असलेल्या सोनाळा परिसरातील एका १६ वर्षे ३ महिने वय असलेल्या कुमारिकेवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे पीडीत ६ महिन्याची गर्भवती झाली. ती बातमी कानावर पडताच या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोनाळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार असे की, आरोपी रमेश राजू सोळंके याने एका १६ वर्ष ३ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १ ऑगस्ट २०२५ पासून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने पीडिता ६ महिन्यांची गर्भवती झाली आहे. तसेच त्याचा भाऊ गणेश राजू सोळंके व वडील राजू काशीराम सोळंके या दोघांनी पिडीतेला रमेश सोळंके सोबत पती पत्नी सारखे राहण्यास भाग पाडले.

तिन्ही आरोपींनी पीडिता व तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली.

पीडिताच्या नातेवाईकाने सोनाळा पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून रमेश राजू सोळंके, गणेश राजू सोळंके, राजू काशीराम सोळंके या तीन आरोपींविरुद्ध कलम ६४ (२), (एफ) (एच) (जे) (एम), ६५(१), ४९, ६९, ३५२, ३५१(३), ३(५) भा न्या संहितासह कलम ४, ६, ८, १०, १२, १७ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वि.प्र.)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!