Advertisement Advertisement

“दवाखान्यात जाते म्हणत निघाली… पण पोरीचा अजून पत्ताच नाही!”

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): दवाखान्यात जाऊन येते असे सांगून घरातून निघालेली २३ वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याची घटना मलकापूर तालुक्यातील निंबारी येथे समोर आली आहे.

याबाबत वडील विकास पुंडलिक वराडे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून मिसिंग क्रमांक ३२/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, ऋतुजा विकास वराडे (वय २३ वर्षे) ही २३ एप्रिल रोजी सकाळी “दवाखान्यात जाऊन येते” असे सांगून घरातून निघाली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला, पण ती कुठेही आढळून आली नाही.

ओळख चिन्हे:

▪️ रंग – गोरा

▪️ उंची – अंदाजे ५ फूट

▪️ केस – काळे, लांब

▪️ बांधा – मध्यम

▪️ कपडे – गुलाबी पंजाबी ड्रेस, पायात चप्पल

सदर वर्णनाची मुलगी कुठेही आढळल्यास मलकापूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!