Advertisement Advertisement

भरधाव दुचाकीची धडक; वृद्धाचा जागीच मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील जलंब नाका–वाडी रोड परिसरात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने भीषण अपघात होऊन ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अल्पवयीन चालकाविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात 👆

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामधन दशरथ ताठे (वय ७०, रा. कोक्ता ता. खामगाव) हे दुपारी सुमारे १.३० वाजता जलंब नाका–वाडी रोडवरून जात असताना नवाज शाह रफिक शाह (वय १७, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. MH 28 K 9050) भरधाव वेगाने चालवत आला आणि ताठे यांना जोरदार धडक दिली.या अपघातात ताठे गंभीर जखमी झाले. मात्र, जखमा अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात 👆

याप्रकरणी गणेश मनोहर ताठे (वय ३८, रा. कोक्ता) यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात अप क्रमांक १७७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(ब), १०६ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम ३/१८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!