Advertisement Advertisement

“जुन्या भांडणाचा राग काढत मुलीची छेडछाड; आईची सोन्याची पोथही तोडली, पाच जणांवर गुन्हा!”

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): मागील भांडणाचा राग मनात ठेवून एका मुलीची छेडछाड करत तिला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी मुलीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडून नुकसान केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे.

. जाहिरात 👆

ही घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. फिर्यादी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या आई, मावशी व आजीसह नातेवाईकाकडे भेटण्यासाठी गेली असता, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी एकत्र येत शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी मुलीला वाईट उद्देशाने पकडून मारहाण केली.

. जाहिरात 👆

या गोंधळात फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोथ, डोरले तुटून पडून नुकसान झाले. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली.

या प्रकरणी पोलिसांनी २५ मार्च रोजी आशा विक्रम मोरे, दुर्गा लक्ष्मण मोरे, दिनकर संपत बरडे, बाळू दिनकर बरडे आणि किरण दिनकर बरडे (सर्व रा. असोला बु. ता. चिखली) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!