Advertisement Advertisement

“चिखलीत सिंगल लावलं पण पाळत कोणीच नाही! ट्रॅफिक पोलिस गायब, नागरिक त्रस्त..!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरात अनेक दिवसांनी नगरपालिकेला जाग येत खामगाव चौफुली, खंडाळा चौफुली आणि राऊतवाडी परिसरात ‘सिंगल’ (ट्रॅफिक सिग्नल) सुरू करण्यात आले. मात्र, सिग्नल सुरू झाले असले तरी त्याचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.


सिग्नल बसवल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण प्रत्यक्षात सिग्नल सुरू झाल्यानंतरही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती जवळपास दिसत नाही.


स्थानिक नागरिकांच्या मते, ज्या ठिकाणी सिग्नल लावण्यात आले आहेत, तिथेच पोलिस नसल्याने वाहनचालक मनमानी करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतुकीचा गोंधळ कायम आहे. “सिग्नल सुरू केले, पण त्याकडे लक्ष देणार कोण?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


दरम्यान, ट्रॅफिक पोलिस इतर ठिकाणी दिसत असल्याने नेमके सिग्नल असलेल्या ठिकाणीच त्यांची अनुपस्थिती का आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नगरपालिकेने सिग्नल सुरू केले असले तरी त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनीही लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकूणच, सिग्नल बसवून उपयोग नाही, तर त्याचे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया सध्या चिखलीकरांमध्ये उमटत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!