Advertisement Advertisement

शेळगाव आटोळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रा. गजानन मिसाळ यांची बिनविरोध निवड…

शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी नुकतीच विशेष सभा उत्साहात पार पडली. या सभेत प्रा. गजानन मिसाळ यांची सर्वानुमते व बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संबंधित निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी प्रा. गजानन मिसाळ यांच्या नावाचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर उपस्थित सर्व संचालकांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना प्रा. गजानन मिसाळ यांनी, “ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देत संस्थेची आर्थिक व प्रशासकीय प्रगती साधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे संचालक, सभासद आणि ग्रामस्थांनी प्रा. मिसाळ यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!