डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): पांगरखेड येथील २० वर्षांची तरुणी शिक्षणासाठी हिवरा आश्रमला जाते असे सांगून २७ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीचे वडील विलास मधुकर नालींदे यांनी शुक्रवारी (दि.१३) डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन उचलला गेला नाही आणि काही वेळातच बंद लागला. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
यानंतर संबंधित वसतिगृहात चौकशी केली असता, तरुणीने आजारी असल्याचा अर्ज देत १४ फेब्रुवारीपासून गैरहजर असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी डोणगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.














