Advertisement Advertisement

चिखलीत ‘शिंदे हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीचे स्थलांतर; उद्या होणार उद्घाटन सोहळा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली शहरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘शिंदे हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीचे स्थलांतर करण्यात आले असून या नव्या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, म्हणजे उद्या १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक सुविधा आणि अद्ययावत उपचार पद्धतींनी सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास प.पू. गुरुवर्य १००८ वेदांताचार्य आचार्य स्वामी श्री हरिचैतन्यनंद सरस्वतीजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, मा. डॉ. पि. डब्ल्यू सांबरे सर (M.D. Obs-Gynac, PhD) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच श्रीमती सुनीता ताई तेजराव शिंदे, सौ. शीलाताई धोंडीराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार असल्याने हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.

उद्या शिंदे हॉस्पिटल चिखली येथे विनीत म्हणून श्री गयाबाई देवराव शिंदे,शोभा रामेश्वर नरवाडे,शिलाताई धोंडीराम पाटील,मिनाताई राजेंद्र शिंदे, डॉ. प्रतिभा दिपक भगत,डॉ. दिपक दत्तु भगत, रामेश्वर ज्ञानदेव नरवाडे, धोंडीराम मारूती पाटील, राजेंद्र देवराव शिंदे यांनी शिंदे हॉस्पिटल येथे यावे म्हणून विनीत केली आहे…

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अभिमन्यु तेजराव शिंदे (M.B.B.S., MS Obs-Gynac, Fertility Specialist, Gynac Endoscopic Surgeon) आणि डॉ. सविता अभिमन्यु शिंदे (M.B.B.S., D.N.B. Pediatrics, L.A.F. Neonatology) हे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करणार आहेत.

उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून हा कार्यक्रम बी.डी.सी.सी. बँकेच्या पाठीमागे, खामगाव चौफुली जवळ, चिखली येथे होणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!