Advertisement Advertisement

महिलांचा मोबाईल हॅक केला अन् तिला तिच्या मोबाईल मध्ये….; सोनाळा पोलिसांत गुन्हा….

संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावात मोबाईल हॅक करून महिलेचा खाजगी डेटा चोरत तिला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ३५ वर्षीय पीडित महिलेचा मोबाईल आरोपीने हॅक केला. त्यानंतर तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, ई-मेल तसेच खाजगी फोटो व व्हिडिओ आपल्या ताब्यात घेतले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने महिलेला वारंवार त्रास दिला.

तसेच व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोपीने केलेल्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पीडितेच्या बहिणीलाही पाठवल्याचे समोर आले आहे. यासोबतच पीडित महिला व तिच्या मुलाला मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी राकेश गिरी (वय २७) याच्याविरुद्ध सोनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!