Advertisement Advertisement

टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातून गॅस सिलेंडर चोरी! पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरत असताना बुलढाणा येथील टीबी हॉस्पिटलमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरातून गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी टीबी हॉस्पिटलमधील स्वयंपाकघराच्या खिडकी व दरवाज्याची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील ७५ गॅस सिलेंडरपैकी एक भरलेला सिलेंडर चोरून नेला. तसेच ऑक्सिजन पाइपलाइनचे तांब्याचे साहित्यही काढून नेल्याची माहिती आहे.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रकरण पोलिसांत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!