Advertisement Advertisement

“बाथरूमला जाते म्हणाली… पण परतच आली नाही; बुलढाण्यात बारावीची पोरी बेपत्ता…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील तहसील चौक परिसरातून बारावीची परीक्षा देऊन परतणारी १७ वर्षे ६ महिन्यांची विद्यार्थिनी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील एका खेडेगावातील विष्णु तुकाराम चव्हाण (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांची नात कुमारी संगीता (नाव बदललेले) हिची बारावीची परीक्षा सुरू आहे.

परीक्षेसाठी ते तिला बसने परीक्षा केंद्रावर आणणे-नेणे करत होते. बुधवार (११ मार्च) रोजी पेपर झाल्यानंतर दुपारी दोघेही बसने बुलढाणा येथे आले. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता तहसील चौक येथे उतरल्यावर संगीता हिने “बाथरूमला जाऊन येते” असे सांगून तेथून निघाली; मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने चव्हाण यांनी तिचा शोध सुरू केला.नातेवाईकांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळले.

नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.बेपत्ता विद्यार्थिनीची उंची सुमारे पाच फूट असून अंगात पांढऱ्या रंगाचा सलवार सूट, सोबत लाल रंगाची बॅग, रंग सावळा व केस लहान काळे असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय नामदेव खवले करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!