Advertisement Advertisement

खामगाव-मेहकर मार्गावर रोहीला भरधाव चारचाकीची धडक; एक जखमी

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव-मेहकर मार्गावर वरवंड जवळ १ मार्च रोजी भरधाव चारचाकीने अचानक रस्त्यावर आलेल्या रोहीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून एक प्रवासी जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणारी (एमएच १६ डी डब्ल्यू ८८१०) क्रमांकाची चारचाकी वरवंड परिसरातून जात असताना अचानक रोही रस्त्यावर आला. चालकाला वाहनावरील ताबा राखता न आल्याने रोहीला जोरदार धडक बसली.


या अपघातात वाहनाचे पुढील भागाचे नुकसान झाले असून एका प्रवाशाला दुखापत झाली आहे. जखमीवर Mehkar येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, धडकेत रोहीदेखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!