Advertisement Advertisement

बारमध्ये सर्व्हिसवरून भांडण; दोन गटात धुमश्‍चक्री ! बाटल्या, सिमेंट ब्लॉक चालले; दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील खामगाव रोडवरील डाउनटाउन बार येथे सर्व्हिसच्या कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका पेटला की दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. प्रकरण वाढत गेल्याने दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

फिर्यादी दिपक अशोक ढोले (वय ३५, रा. नांदुरा) यांच्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता ते जेवणासाठी बारमध्ये गेले असता सर्व्हिस नीट न मिळाल्याने त्यांनी व्यवस्थापकाला जाब विचारला. त्यावर व्यवस्थापक, शिवा नावाचा इसम व इतर ५ ते ६ कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काचेच्या बाटलीने डोक्यावर वार केला, तसेच सिमेंट ब्लॉक व प्लास्टिक पाईपने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात काही जण जखमी झाले असून त्यांच्या जबाबावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार निलेश गाडगे करत आहेत.

दरम्यान, बारचे मालक राकेश रमेशलाल काशेलानी (वय ५१, रा. शेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळाच दावा केला आहे. संबंधित तिघे इसम मद्यधुंद अवस्थेत येऊन बारमधील काच, फ्रीजर व इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच कामगार इस्वर चंदाने यांच्या पायावर फावड्याने मारहाण करून स्वतःलाही चापटाबुक्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. झटापटीत तिघेही खाली पडून जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!