देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील प्रतापनगर परिसरात राहणारी सानियाबी हनीफ सैयद (वय १९ वर्षे) ही तरुणी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रतापनगर भागातील रहिवासी फर्जानाबी सैयद हनीफ यांची मुलगी सानियाबी हनीफ सैयद हिने घरातून “सामान आणण्यासाठी जाते” असे सांगून बाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करून तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून न आल्याने अखेर ८ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सानियाबीचा रंग गोरा असून उंची सुमारे ५.५ फूट, बांधा मजबूत आहे. बेपत्ता होताना तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार मुसा व गजानन काकड हे करीत आहेत. तरुणीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.














