Advertisement Advertisement

मजूर निघाला राक्षस! लहान लेकराला एकटी असल्याचे पाहून नराधम संतोषने तिला झोपडीत नेऊन तिच्यावर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात घडलेल्या एका किळसवाण्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर काम करणाऱ्या २५ वर्षीय परप्रांतीय मजुराने ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून मलकापूर रेल्वे स्टेशन गाठले, मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीकडे कोणतेही वैध ओळखपत्र नसल्याचे समोर आल्याने ठेकेदार व कंपनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो व अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, पीडित चिमुरडीची प्रकृती गंभीर असून तिला अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!