Advertisement Advertisement

“क्लासला गेली अन् गळ्यात हात टाकला…!” १८ वर्षीय युवतीचा विनयभंग; मलकापूरमध्ये खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
मलकापूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एमएस-सीआयटी क्लासला गेलेल्या १८ वर्षीय युवतीचा गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी कैलास वासुदेव गणगे (वय ४३, रा. माता महाकाली नगर, मलकापूर) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ५ जानेवारी रोजी एमएस-सीआयटी क्लाससाठी गेली असता क्लासमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळ्यात हात टाकून अश्लील चाळे करत विनयभंग केला.


घडलेला प्रकार युवतीने आपल्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर, ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने माझ्यासोबतही अशाच प्रकारे विनयभंग केला होता, अशी माहिती मैत्रिणीने दिली. त्यामुळे आरोपीने दोघींचाही विनयभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी गुन्हा क्रमांक २०/२०२६ अन्वये आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ७४, ७९ व ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुनील राऊत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!