Advertisement Advertisement

नर्सिंगच्या डिप्लोम्याचं सांगून घराबाहेर पडली, पण नूतन घरी परतलीच नाही! तळणीच्या २० वर्षीय युवतीच्या बेपत्ता होण्याने खळबळ!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील तळणी येथील २० वर्षीय युवती नर्सिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी मलकापूरला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली; मात्र ती घरी परतलीच नाही. १९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. नुतन सुपडा उंबरकर असे बेपत्ता युवतीचे नाव असून, या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील सुपडा मारोती उंबरकर यांची मुलगी नुतन सुपडा उंबरकर (वय २०) ही १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मलकापूर येथे नर्सिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही.

कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची फिर्याद तिचे वडील सुपडा मारोती उंबरकर यांनी बोराखेडी पोलिसांत दिली.

या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वाघ करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!