Advertisement Advertisement

तलावाजवळ थैली पडलेली दिसली, उघडून पाहताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली! आत होती नवजात चिमुकली!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील धाड नाका परिसरात सरकारी तलावाजवळ एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना आज १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह वायरच्या थैलीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने माणुसकीलाच काळिमा फासल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तलावाजवळ एका थैलीत नवजात मुलीचा मृतदेह असल्याचे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी याची माहिती बुलढाणा शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दखल घेत पुढील तपास सुरू केला.

ही चिमुकली नेमकी कोणाची? तिला तलावाजवळ कोण आणि कधी घेऊन आले? थैली तिथे कोणी ठेवली? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. बालिकेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, हेही स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, नवजात बालिकेची ओळख पटविणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधणे, हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. या घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतरच या धक्कादायक प्रकारामागील सत्य समोर येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!