शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. शेळगाव आटोळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून महिलांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला.
या वाटपामुळे सणासुदीच्या काळात गोरगरीब कुटुंबांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांसाठी हा शिधा उपयोगी ठरणार आहे.
यावेळी शेळगाव आटोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोषराव बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य मुक्ताताई देशमुख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामराव बोर्डे, साहेबराव शेवाळे, गजानन मिसाळ, अनिल देशमुख, शेखलाल मामू, कृष्णा मिसाळ, पप्पू खर्डे, राजू मिसाळ आणि आशिष देशमुख यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
















