Advertisement Advertisement

मजुरीच्या पैशांच्या वादातून महिलेला मारहाण; जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा!

दुसरबीड (बुलढाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेड राजा तालुक्यातील पांग्री उगले येथे मजुरीच्या पैशांच्या वादातून एका महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता कडूबा निकाळजे (वय ४५, रा. पांग्री उगले) यांचा १२ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मजुरीच्या पैशांवरून वाद झाला. या वादातून गजानन धनसिंग राठोड, जितेंद्र गजानन राठोड, जनाबाई गजानन राठोड आणि कोमल जितेंद्र राठोड यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), २९६, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!