Advertisement Advertisement

काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी २० कोटींची ऑफर? आ.लिंगाडे यावर म्हणाले मला ऑफर आली….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेदरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला होता.

मात्र, या दाव्याचे आमदार धीरज लिंगाडे यांनी ठामपणे खंडन केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे मलाही आश्चर्य वाटले. ते महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आहेत, मात्र त्यांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे.”

लिंगाडे पुढे म्हणाले, “मला कोणतीही ऑफर आलेली नाही. भविष्यात अशी कोणतीही ऑफर आली तरी मी ती धुडकावून लावेन. मी पैशांसाठी राजकारणात आलेलो नाही.” तसेच, या वक्तव्याबाबत आपण स्वतः संजय राऊत यांची भेट घेऊन विचारणा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या दाव्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी आमदार धीरज लिंगाडे यांनी संबंधित आरोप फेटाळल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!