Advertisement Advertisement

देवदर्शन करून परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत!बसच्या धडकेत गंभीर जखमी; उपचार सुरू असताना भाविकांचा मृत्यू!

बिबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देवदर्शन करून आनंदाने घरी परतत असताना मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एका भाविकावर काळाने घाला घातला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असताना बसने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश अश्रूजी मुंडे (रा. किनगाव जट्टू) असे मृत भाविकाचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेल मोगराजवळ घडली.

रमेश मुंडे हे सहकुटुंब दुधा ब्रह्मपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते घरी परतत असताना मेहकर-सुलतानपूर महामार्गावरील हॉटेल मोगराजवळ त्यांनी आपले वाहन थांबवले. यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असताना भरधाव बसने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर उपस्थित भाविकांनी खाली उतरून पाहिले असता रमेश मुंडे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेप्रकरणी मृताची पत्नी यांनी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. देवदर्शनाहून परतताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे किनगाव जट्टू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!