Advertisement Advertisement

रात्री ती घराच्या सोबत झोपली अन् सकाळी उठले तर कोणाला न सांगता गायब झाली!

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथून एका १९ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी रात्रीच्या वेळी घरातील सर्व सदस्य झोपेत असताना कोणालाही काहीही न सांगता घरातून अचानक निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांनी पाहिले असता ती घरात नसल्याचे लक्षात आले. तिच्या खोलीसह परिसरात शोध घेतला असता कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, घरातील काही रोकड रक्कमही गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता आणखी वाढली आहे.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी गावात तसेच परिसरातील नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. मात्र, उशिरापर्यंत कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अलिकडच्या काळात महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून संबंधित तरुणीचा शोध सुरू असून, विविध अंगांनी तपास करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!