चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी” नावाची भन्नाट चर्चा रंगताना दिसत आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामपासून व्हॉट्सअॅप स्टेटसपर्यंत या पार्टीचे मीम्स, पोस्टर आणि भन्नाट व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. अभिजित दिपके यांनी स्थापन केलेल्या या पक्षाला 4 दिवसात सुमारे 15 मिलियन लोकांनी फॉलो केले आहे तर भाजपा च्या ऑफिसिअल अकाउंट वर 8 मिलियन followers असून भाजपाला सुद्धा या पक्षाने मागे पाडले आहे. यात आता बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यानेही एन्ट्री मारली असून गावाकडच्या तरुणांच्या एकजुटीचा वापर करत या ट्रेंडला अजूनच रंगत आणली आहे.
चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील महेश म्हस्के या तरुणाने थेट “चिखली विधानसभा प्रमुख” म्हणून स्वतःची जबाबदारी घेत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पोस्टर, व्हिडीओ आणि गावठी स्टाईलमधील घोषणा यामुळे महेश म्हस्केची चर्चा आता तालुकाभर सुरू झाली आहे. “आता गावागावात कॉक्रोच जनता पार्टीची हवा” अशी चर्चा तरुणांमध्ये रंगताना दिसत आहे.














