Advertisement Advertisement

नवस फेडायला गेले, पण मधमाशांचा हल्ला; ८ ते १० भाविक जखमी..! चिखली तालुक्यातील घटना

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवस फेडण्यासाठी करवंड येथील कमळनाथ मंदिर परिसरात आलेल्या भाविकांवर आगेमोहळच्या मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या घटनेत सुमारे ८ ते १० भाविक जखमी झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील साकेगाव येथील एक कुटुंबीय व त्यांचे आप्तेष्ट नवस फेडण्यासाठी मंदिरात आले होते. दर्शनादरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला चढवून कुटुंबातील ४ महिला व २ पुरुषांना चावा घेत जखमी केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये एकच धावपळ उडाली.

जखमींना तत्काळ उदयनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, करवंड येथील पाणीपुरवठा कर्मचारी आकाश गवई व पेंटर गवई यांनाही मधमाशांनी दंश केल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले. या घटनेनंतर मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!