Advertisement Advertisement

पतीच्या संमतीने नणंदेच्या पतीकडून विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; डोणगाव परिसर हादरला…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या संमतीने नणंदेच्या पतीने (नंदोई) विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला असून, या प्रकरणी आरोपी नंदोई, पीडितेचा पती आणि सासू यांच्याविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय २४) हिने दिलेल्या तक्रारीत, हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तिच्या नंदोईने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या कथित अत्याचारासाठी तिच्या पतीने आणि सासूने मदत केल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे.

तक्रारीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून तिचा लैंगिक छळ सुरू होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेने ३० जून रोजी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे डोणगाव पोलिसांनी आरोपी नंदोई, पती आणि सासू यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६४(२)(एम), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले करीत आहेत.

या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!