Advertisement Advertisement

BIG BREAKING..!सोमठाण्यात तिहेरी हत्याकांडानं उडाला थरकाप! आई, भाऊ अन् पुतण्याला संपवलं!शेतीच्या वादानं घरातच पेटला रक्ताचा खेळ!चाकूच्या वारांनी तीन जीवांचा घात!आरोपी फरार; गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार चाकूने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे सोमठाण्यात शोककळा पसरली असून, नात्यांनाच काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या घटनेत सरस्वती फत्तेसिंह सुरडकर (वय ७०), संजय फत्तेसिंह सुरडकर (वय ५५) आणि रणजीत संजय सुरडकर (वय २५) यांचा मृत्यू झाला आहे. आई, मुलगा आणि नातू अशा एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा या घटनेत अंत झाला. या तिघांवर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप दीपक फत्तेसिंह सुरडकर याच्यावर असून, घटनेनंतर तो फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दीपकच्या नावावरील शेती त्याच्या आईने भावाच्या नावावर केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शेती नेमकी कोणाच्या नावावर करण्यात आली होती, त्यावरून वाद कसा निर्माण झाला आणि हत्येमागील नेमका हेतू काय होता, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली असून फरार आरोपी दीपक सुरडकरचा शोध सुरू आहे. हल्ल्याचा नेमका क्रम, घटनेपूर्वी कुटुंबात काय वाद झाला होता आणि या तिहेरी हत्याकांडामागील खरे कारण काय, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.

७० वर्षांची आई, ५५ वर्षांचा मुलगा आणि अवघा २५ वर्षांचा नातू… तिघांचे आयुष्य संपले! एका शेतीच्या वादातून हा रक्तरंजित प्रकार घडला का, हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. मात्र, प्राथमिक माहितीवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नसून, पोलिसांच्या तपासानंतरच या हत्याकांडामागील संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!