Advertisement Advertisement

रोहडा-अंत्री खेडेकर रस्त्यासाठी सुरू असलेले उपोषण मागे; आजपासून काम सुरू करण्याचे आश्वासन…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील रोहडा ते अंत्री खेडेकर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी रोहडा व अंत्री खेडेकर येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, रस्त्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी सोमवारी दुपारी चार वाजता उपोषण मागे घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी उपोषणस्थळी भेट देत रोहडा ते अंत्री खेडेकर या सुमारे चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री उद्यापासून पाठवून काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे उपसभापती किसनराव धोंडगे, माजी सभापती राम खेडेकर, आरपीआयचे विदर्भाध्यक्ष संजय वाकोडे आदींचा समावेश होता.

उपोषणात राहुल टाकळकर, संजय खेडेकर, सागर खरात, समाधान पेंढारकर, अमोल मोरे, मधुकर शेळके, प्रमोद मोरे, दगडू खेडेकर, उत्तम माळेकर, शिवाजीराव खेडेकर, विनायक खेडेकर, अजाबराव खेडेकर, भिकाजी खेडेकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे गजानन वायाळ, शिवसेना नेते संतोष भुतेकर आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री खा. प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक नीरज काकडे उपस्थित होते.

आश्वासनानंतर डॉ. शशिकांत खेडेकर आणि सुभाष दराडे यांच्या हस्ते आंदोलकांना थंड पेय देऊन उपोषण सोडण्यात आले. तसेच आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी तहसीलदार विजय सवडे, उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!