Advertisement Advertisement

नालीतील घाण काढण्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नालीतील घाण काढण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान शेतकऱ्याला मारहाणीत झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव येथे ९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सुनील विक्रम लोखंडे (वय ४२) यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, नालीतील घाण काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून रमेश प्रभाकर सोनुने, मनिषा रमेश सोनुने, प्रांजल रमेश सोनुने, कोमल रमेश सोनुने, तेजल रमेश सोनुने तसेच रमेश सोनुने यांचा साला गलबले यांनी एकत्र येत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी व चापटांनी मारहाण करत फावड्यानेही हल्ला करून त्यांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी संबंधित सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१, १९१(३), १९०, ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!