Advertisement Advertisement

देऊळगाव महीत विजेचा धक्का; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरातील होल्डरमध्ये वायर बसविताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० मार्च रोजी सायंकाळी घडली.गणेश आश्रुबा बनसोडे (वय ३५) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात 👆

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बनसोडे हे रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ३० मार्च रोजी दिवसभर काम आटोपून ते सायंकाळी घरी परतले. घरातील वीज होल्डरमध्ये वायर बसवित असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही क्षणांतच वीजपुरवठा पुन्हा सुरू होताच त्यांच्या हाताचा उघड्या तारेशी संपर्क आला आणि त्यांना जोरदार करंट लागला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

आधारवड हरपला….

गणेश बनसोडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधार असलेली व्यक्ती अचानक गेल्याने घरावर मोठे संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या तिन्ही मुलांपैकी लहान मुलगा योगेश हा गतिमंद असून त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येत होता. अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीतही गणेश बनसोडे मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलाच्या औषधोपचाराचा खर्च भागवत होते.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!