Advertisement Advertisement

पहाटेचा प्रवास जीवावर बेतला; ईर्टिगा झाली पलटी! चिखली–अमडापूर रोडवर अपघात…

चिखली(राजेश लोखंडे:बुलडाणा कव्हरेज न्युज): आज सोमवार, पहाटेच्या सुमारास चिखली–अमडापूर रोडवर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. एमएच 28 सीसी 6696 क्रमांकाची ईर्टिगा कार रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाल्याने परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. पहाटेची वेळ आणि चालक झोपेच्या धुंदीत असल्याने अपघात झाल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी सुरू होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त गाडीत चालक एकटाच प्रवास करत होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. वाहनाचे समोरील भागाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित ईर्टिगा कार बुलढाण्याकडून आपल्या गावाकडे जात असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये होती. मात्र चालक नेमका कुठल्या गावचा आहे, तसेच अपघाताचे अचूक कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!