Advertisement Advertisement

दोन अज्ञात पोरांनी काठीने दिली धुलाई; युवक जखमी…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील क्रीडा संकुल रोड परिसरात दोन अज्ञात मुलांनी एका युवकाला काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोपान बाबासाहेब मस्के (वय ६६, रा. आयटीआय कॉलनी, किडा संकुल रोड, बुलढाणा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा महेश सोपान मस्के (वय २५) हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे. शनिवार ७ मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजता त्याच्या दोन्ही पायांवर काठी मारल्याचे व्रण दिसून आल्याने त्याला विचारणा करण्यात आली.तेव्हा त्याने सांगितले की, सोमवार २ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता राणा मंडप डेकोरेशनसमोर, क्रीडा संकुल परिसरात असताना दोन अज्ञात मुलांनी त्याला काठीने मारहाण केली.

या घटनेप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!