Advertisement Advertisement

दशक्रिया विधीत मधमाशांचा हल्ला; रायपूरजवळ २५ ते ३० जण जखमी…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिवरा आश्रमजवळ रायपूर परिसरात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (८ मार्च) सकाळी घडली. या घटनेत सुमारे २५ ते ३० जण जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रायपूर येथील हभप विठ्ठल महाराज काळे यांचे २७ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या दहाव्या दिवसाच्या विधीसाठी कुटुंबीय व नातेवाईक पैनगंगा नदीकाठी गेले होते. धार्मिक विधी सुरू असतानाच जवळील आग्या मोहोळातील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अनेक जण जखमी झाले.


घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कचऱ्याचा धूर करून मधमाशा पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना तातडीने हिवरा आश्रम व जानेफळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!