Advertisement Advertisement

मोठी बातमी..! जिल्हा बँक निवडणुकीत पहिला निकाल; माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे अविरोध विजयी, सहकारातील दबदबा कायम…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वीच पहिला निकाल जाहीर झाला असून, माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा सोसायटी मतदारसंघातून अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा त्यांच्या वर्चस्वाची नोंद झाली आहे.

सिंदखेडराजा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्या विरोधात राहेरी (ता. सिंदखेडराजा) येथील दत्ताराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीनंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी दत्ताराव देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अविरोध निवड निश्चित झाली. जिल्हा बँक निवडणुकीतील हा पहिलाच निकाल ठरला असून, सहकार क्षेत्रातील डॉ. शिंगणे यांचा प्रभाव आणि दबदबा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता उर्वरित जागांवरील निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!